
स्व. गुणवंतराव सरकटे यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त सामाजिक उपक्रम
अंजनगाव सुर्जी | प्रतिनिधीस्व. गुणवंतराव सरकटे यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत सावितर उत्थान फाउंडेशनच्या वतीने अंजनगाव सुर्जी येथील दिगंबरराव पेटकर आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी हा सामाजिक उपक्रम पार पडला.
यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्यात आले. साहित्य वाटपानंतर विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत हितगुज करण्यात आले. शिक्षणाचे महत्त्व, मेहनत, आत्मविश्वास तसेच भविष्यातील ध्येय याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर विचार मांडण्यात आले.
विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मनस्वी आनंद झाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावता आल्याचे आत्मीय समाधानही लाभले.

. आरती चंद्रकांत बोदडे आणि अॅड. चंद्रकांत बबनराव बोदडे यांनी सामाजिक संदेश देत, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी छोटासा हातभार लावण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले.
