अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या पथकाने चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांत छडा लावत आरोपीला अटक केली. आरोपीकडून ६ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत आणि रोख ५०० रुपये असा एकूण ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सौ. सीमा मनोज राठोड (वय ३८, रा. महात्मा फुले नगर, खदान, अकोला) यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान त्यांच्या राहत्या घरातील कपाटातून ६ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, किंमत ७२ हजार रुपये, तसेच ५०० रुपये रोख असा एकूण ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.या तक्रारीवरून खदान पोलीस ठाण्यात कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचा तपास सुरू असताना फिर्यादीने आपल्या पतीवर संशय असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी मनोज नंदकिशोर राठोड (वय ४५, रा. महात्मा फुले नगर, खदान, अकोला) याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.आरोपीने चोरीची सोन्याची पोत सराफा व्यावसायिकाकडे गहाण ठेवल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी संबंधित सराफा व्यावसायिकाच्या ताब्यातून ६ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत किंमत ७२ हजार रुपये आणि आरोपीच्या ताब्यातून ५०० रुपये रोख, असा एकूण ७२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे चोरीचा गुन्हा उघडकीस आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ निलेश खंडारे, पोहेकॉ भूषण मोरे, पोहेकॉ अभिमन्यू सदांशिव, पोलीस कॉन्स्टेबल वैभव कस्तुरे, मंगेश खेडकर आणि शिवम दुबे यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us