कोळंबी (प्रतिनिधी):कोळंबी गावातील सार्वजनिक RO पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरजवळ सांडपाणी व कचरा साचल्याने परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून काही ग्रामस्थ आजारी पडत आहेत. या समस्येकडे लक्ष देऊन प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.​प्रमुख मागण्या:​RO फिल्टर परिसराची तातडीने स्वच्छता करण्यात यावी.​साचलेल्या सांडपाण्याचा तात्पुरता व कायमस्वरूपी निचरा व्हावा.​डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसरात त्वरित औषध आणि जंतुनाशक फवारणी करावी.​स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावातील सार्वजनिक व महत्त्वाच्या ठिकाणांची स्वच्छता टिकून राहावी आणि ग्रामस्थांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी संबंधित विभागाने यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी विनंती कोळंबी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us