मुर्तिजापूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार SIR-2026 अंतर्गत 032-मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू आहे. यासाठी मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर 19, 20, 26 व 27 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.या शिबिरांमध्ये नमुना अर्ज क्र. 6, 7 व 8 स्वीकारण्यात येणार असून, नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती तसेच अपात्र, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज करता येणार आहेत. पात्र नागरिकांना अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.विशेषतः 18 वर्षे पूर्ण झालेले युवक, 1 ऑक्टोबर 2026 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारे युवक, महिला, दिव्यांग तसेच पात्र असूनही मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, मुर्तिजापूर यांनी केले आहे.नागरिकांना voters.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us