
अकोला:अमली पदार्थांच्या वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी आणि तरुण पिढीला गुन्हेगारी प्रवृत्तींपासून वाचवण्यासाठी अकोला जिल्हा पोलीस दलाने आक्रमक पाऊल उचलले आहे. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली चालवल्या जात असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत गुरुवारी, १७ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला शहरात विशेष मोहीम राबवून अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ८ जणांवर धडक कायदेशीर कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अकोला शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अचानक छापे मारून ही कारवाई केली. यामध्ये अकोट फाईल, जुने शहर, कोतवाली आणि रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकूण आठ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.कारवाई करण्यात आलेल्या संशयितांची नावे:चेतन संदीप शिंदे (वय २२, रा. देशमुख फेल, अकोला)जमीरोद्दीन कामरोद्दीन (वय २४, रा. मोहतामिल, अकोला)शैलेश मधुकर धांडे (वय ४३, रा. महाकाली नगर, अकोला)शंकर विजय लाखे (वय २१, रा. रमाबाई आंबेडकर नगर, अकोला)अब्दुल समद अब्दुल लतीफ (वय ६०, रा. कादरीपुरा, अकोट फाईल, अकोला)शेषराव रमेश वारोकार (वय ३५, रा. पंचशील नगर, वाडेगाव, ता. बाळापूर)शिवशंकर अरुण सोनटक्के (वय ४०, रा. धोतर्डी, जि. अकोला)शेख अफसर शेख अहमद (वय ३८, रा. अशोक नगर, अकोट फाईल, अकोला)मोहीम यापुढेही तीव्र राहणार: पोलीस प्रशासनअमली पदार्थांचे सेवन हे केवळ शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी घातक नसून यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्यही धोक्यात येते. त्यामुळे शहरात अमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन पूर्णपणे रोखण्यासाठी ही मोहीम यापुढेही सातत्याने राबवली जाणार आहे. अमली पदार्थांशी संबंधित कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.