अकोला:अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत खदान पोलीस स्टेशनच्या पथकाने एका मोठ्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल २७,६२,८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. येवता रोडवरील मलकापूर परिसरातील क्लासमेट हॉटेल अँड बार येथे १७ सप्टेंबर २०२६ रोजी ही धडक कारवाई करण्यात आली.​गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या ९ आरोपींना ताब्यात घेतले असून, ६ आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.​अटक करण्यात आलेले आरोपी:१. कुणाल सुनीलकुमार मनवानी (वय २६, रा. सिंधी कॅम्प)२. कुशल विमलकुमार कायना (वय २१, रा. सिंधी कॅम्प)३. जतीन सुनीलकुमार मनवानी (वय १९, रा. सिंधी कॅम्प)४. दीपक परमानंद सिदारा (वय ४१, रा. आदर्श कॉलनी)५. निशांत मेघराज बजाज (वय २४, रा. आदर्श कॉलनी)६. राहुल दौलत चौथानी (वय २५, रा. सिंधी कॅम्प)७. आशिष चंदुलाल जसवानी (वय २८, रा. सिंधी कॅम्प)८. रोशन अनिलकुमार राजपाल (वय २४, रा. सिंधी कॅम्प)९. वंश महेशकुमार टकरानी (वय १७ वर्षे ६ महिने, रा. नानकनगर, निमवाडी)​फरार आरोपी:सुमीत गुरबानी, पवन चेनानी, कौशीक प्रकाश शोधनानी, अमित बालचंदानी, जितेंद्र कमलकुमार खबरानी व विजय अहुजा (सर्व रा. सिंधी कॅम्प, अकोला) या ६ जणांचा पोलीस शोध घेत आहेत.​जप्त केलेला मुद्देमाल:पोलिसांनी घटनास्थळावरून ९ वाहने, ८ मोबाईल फोन आणि रोख रक्कमेसह एकूण २७ लाख ६२ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.​सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे, सह.पो.नि. राहुल जंजाळ, पोउपनि दीपक पवित्रकार, तसेच अंमलदार निलेश खंडारे, भूषण मोरे, गिरीश वीर, प्रवीण डोंगरे, अभिमन्यू सदांशिव, शिवम दुबे, मंगेश खेडकर, वैभव कस्तुरे आणि आकाश कठाने यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us