मूर्तिजापूर : ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अवैध धंद्यांविरोधात मूर्तिजापूर शहर पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला असून, २ ऑक्टोबर रोजी केलेल्या कारवाईत ४०० नग देशी दारूचे सिलबंद क्वॉर्टर असा अंदाजे २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

शहर पोलिसांचे पथक २ ऑक्टोबर रोजी सकाळी पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. यावेळी मधु गौड व्यंकट गौड भंडारी (वय ४०) याच्याकडून बॉबी संत्रा कंपनीच्या देशी दारूचे प्रत्येकी ९० मिली क्षमतेचे ४०० सिलबंद क्वॉर्टर जप्त करण्यात आले.

या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७००/२०२६, महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध धंद्यांवर सातत्याने लक्ष ठेवून गोपनीय माहितीच्या आधारे तातडीने कारवाई करण्याच्या शहर पोलिसांच्या भूमिकेमुळे ‘ऑपरेशन प्रहार’ला प्रभावी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. अवैध दारूविक्रीसारख्या प्रकारांवर कारवाई सुरू राहिल्यास शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

कारवाईत सहायक फौजदार सुरेश पांडे, पोहेकॉ सचिन दांदळे, सचिन दुबे, गजानन खेडकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल नामदेव आडे यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us