
मूर्तिजापूर | प्रतिनिधीमूर्तिजापूर शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये वाढत्या डासांच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यात आली. प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक तसव्वर खान यांच्या पुढाकाराने परिसरातील विविध भागांत ही फवारणी करण्यात आली.मोहम्मद प्लॉट, खडकपूरा, रहमत नगर, रोशन नगर, ५२ गेट, हीरपूर नाका, टांकवाढी, बलखंडे लेआउट आणि प्रभाकर बाग या परिसरांमध्ये फवारणी करण्यात आली.पावसाळ्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून ही प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली.परिसरातील स्वच्छता, डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन नगरसेवक तसव्वर खान यांनी संबंधित यंत्रणेशी समन्वय साधत फवारणी करून घेतल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, प्रभागातील इतर भागांमध्येही गरजेनुसार नियमित फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.