अकोला:फटाक्यांसारखा मोठा आवाज काढून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या आणि नागरिकांना त्रास देणाऱ्या दुचाकीस्वारांवर अकोला पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जप्त केलेले ३५० बनावट बुलेट सायलेन्सर आणि ७० फॅन्सी नंबर प्लेट्सवर शुक्रवारी रोड रोलर फिरवून ते पूर्णपणे नष्ट करण्यात आले.

शहर वाहतूक शाखा आणि जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली होती. यामध्ये बुलेटला बेकायदेशीरपणे मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावून ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर भर देण्यात आला. या सायलेन्सरच्या आवाजामुळे वृद्ध, लहान मुले, आजारी व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नागरिकांकडून वाहतूक शाखेकडे सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या.

रोड रोलर फिरवून सायलेन्सरचा चक्काचूरन्यायालयाची परवानगी आणि पोलीस अधीक्षक यांच्या मान्यतेनंतर, दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३:४५ वाजता जुन्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील आम रोडवर पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत ३५० बनावट सायलेन्सर आणि ७० फॅन्सी नंबर प्लेट्सवर रोड रोलर चालवून त्या समूळ नष्ट करण्यात आल्या.

पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांचे नागरिकांना आवाहन:”बुलेट चालकांनी कंपनीकडून मिळणाऱ्या मूळ (ओरिजिनल) सायलेन्सरचाच वापर करावा. यापुढेही बनावटी सायलेन्सर आढळल्यास दंडात्मक कारवाई करून सायलेन्सर जप्त केले जातील. सर्व वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे, प्रवासादरम्यान वाहनांची मूळ कागदपत्रे सोबत ठेवावीत आणि वाहनांवर थकीत दंड असल्यास तो त्वरित वाहतूक पोलीस किंवा शहर वाहतूक शाखेत जमा करावा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us