
प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडवत पोलीस बॉईज संघटना मूर्तिजापूरच्या सदस्यांनी रस्त्यावर पडलेला सुमारे ३० हजार रुपयेg किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल मूळ मालकाला परत करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या प्रामाणिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.प्रतीक नगर, मूर्तिजापूर येथील राहिवाशी शुभम तामसे हे आपल्या दुचाकीने प्रतीक नगर येथून अकोला नाक्याकडे जात असताना गाडगे महाराज चौक परिसरात त्यांच्या खिशातील मोबाईल रस्त्यावर पडला. काही वेळाने त्या मार्गाने दुचाकीने जात असलेले पोलीस बॉईज संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप घाटे आणि संघटनेचे सदस्य नितेश चव्हाण यांना हा मोबाईल दिसला. त्यांनी तो मोबाईल आपल्याजवळ सुरक्षित ठेवत मोबाईल सापडल्याची माहिती त्यांनी आपले मित्र श्री आईबाबा बहूउद्देशीय संस्था अध्यक्ष तथा पोलीस बॉईज संघटनेचे सदस्य गजानन चव्हाण यांना दिली. त्यावर चव्हाण यांनी त्यांना मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मोबाईल जमा करण्याचा सल्ला दिला.दरम्यान, आपला हरवलेला मोबाईल शोधत असलेल्या शुभम तामसे यांनी मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी नितेश चव्हाण यांनी फोन उचलून दादा तुमचा मोबाईल आमच्याकडे सुरक्षित आहे. तुम्ही कोणतीही काळजी करू नका. आपण शहर पोलीस स्टेशनला या पोलीस निरीक्षक धमेंद्र जोशी साहेबांच्या उपस्थितीत तुम्हाला मोबाईल परत देतो, असे सांगून त्यांना दिलासा दिला.त्यानंतर मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक धमेंद्र जोशी यांच्या हस्ते शुभम तामसे यांना त्यांचा मोबाईल परत करण्यात आला. शुभम हा पुणे येथे जॉब करीत आहे,मोबाईल मिळताच हा मोबाईल फक्त मोबाईल नाही यामध्ये माझा सर्व डेटा आहे व माझे सर्व काही आहे असे बोलून सुटकेचा श्वास टाकत सर्वांचे आभार मानले, यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजु वानखडे, नितीन राठोड, पो. नामदेव आडे, मिश्राजी व संघटनेचे ता अध्यक्षv संदीप घाटे,सदस्य नितेश चव्हाण,(लाखपुरी) , शुभम जयस्वाल, प्रेम बैतुले, वैभव वानखडे आणि सचिन येरडावकर, गजानन चव्हाण उपस्थित होते.हरवलेला मोबाईल प्रामाणिकपणे परत करण्याच्या या कार्याबद्दल पोलीस निरीक्षक धमेंद्र जोशी यांनी पोलीस बॉईज संघटनेच्या सदस्यांचे कौतुक केले. तसेच त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी,पोलीस बॉईज संघटना मूर्तिजापूरची टीम खरोखरच कर्तृत्ववान असून, अशा प्रामाणिक आणि सामाजिक जाणीव असलेल्या युवकांचा समाजाला अभिमान वाटला पाहिजे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.सापडलेली वस्तू स्वतःकडे न ठेवता ती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याच्या या कृतीतून पोलीस बॉईज संघटनेच्या सदस्यांनी प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीचा आदर्श घालून दिला आहे.