नवरात्र महोत्सवानिमित्त प्रा. जयंत वेलणकर (नागपूर) यांचे अनुभव कथन; भाविकांसाठी आध्यात्मिक पर्वणी

मूर्तिजापूर | लोक कट्टा न्यूज
नवरात्र महोत्सवानिमित्त लकी अग्रवाल व समता नगर मित्रपरिवाराच्या वतीने मूर्तिजापूर येथील भक्तिसाधना मंदिर, समता नगर येथे ‘श्री गजानन महाराज अनुभूती’ या विशेष आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नागपूर येथील प्रा. जयंत वेलणकर हे श्री गजानन महाराजांच्या भक्तांना आलेल्या विविध अनुभवांचे कथन करणार आहेत.
प्रा. जयंत वेलणकर यांनी लिहिलेल्या ‘श्री गजानन अनुभव’ या पुस्तकाच्या भाग १, २ व ३ मधील अनुभवांच्या माध्यमातून भाविकांना श्री गजानन महाराजांच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा परिचय करून दिला जाणार आहे. महाराजांवरील श्रद्धा दृढ व्हावी, मनातील शंका व प्रश्नांवर आध्यात्मिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन मिळावे आणि भाविकांना प्रेरणा मिळावी, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
श्री गजानन महाराजांवरील श्रद्धा अधिक दृढ व्हावी, भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन मिळावे आणि महाराजांच्या अनुभूतीचे विचार अधिकाधिक भाविकांपर्यंत पोहोचावेत, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर व परिसरातील श्री गजानन महाराजांच्या भक्तांसाठी हा कार्यक्रम विशेष पर्वणी ठरणार आहे.
कार्यक्रमाचा तपशील
दिनांक: गुरुवार, १५ ऑक्टोबर
वेळ: सायंकाळी ५:३० वाजता
स्थळ: भक्तिसाधना मंदिर, समता नगर, मूर्तिजापूर
अनुभव कथन: प्रा. जयंत वेलणकर, नागपूर
आयोजक: लकी अग्रवाल व समता नगर मित्रपरिवार
या आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.