अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, पाणी बचतीचा दिला संदेश

मुर्तिजापूर | लोक कट्टा न्यूज
अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. लायन्स क्लबचे अध्यक्ष सतीश अग्रवाल यांनी उपस्थितांना पाणी बचतीची शपथ दिली. तसेच, प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन केले. पाणीटंचाई आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा संदेश महत्त्वपूर्ण ठरला.अग्रवाल समाजबांधवांची उपस्थितीया शोभायात्रेत विजय भारुका, विजय भूत, सुनील भूत, पवन भूत, संजय अग्रवाल, कैलास अग्रवाल, अॅड. अविन अग्रवाल, अंकित अग्रवाल, अॅड. हर्षल, करुणा अग्रवाल, सुनील भोजगडिया, अजय अग्रवाल, गोविंद अग्रवाल, उज्ज्वल भूत, नितेश भूत, अश्विन पचेरीवाल, भरत भूत, पंकज निमोदिया, अंकुश अग्रवाल, अनिल भूत, भूषण अग्रवाल, जय दज्जुका, प्रकाश निमोदिया, जयप्रकाश दज्जुका, पंकज अग्रवाल, मयूर भूत, चेतन दज्जुका, आनंद अग्रवाल, वसंत अग्रवाल, राजेश अग्रवाल, कमलेश अग्रवाल, पियुष भोजगडिया, प्रतीक भारुका, आशिष भारुका, प्रमोद अग्रवाल आणि शैलेश अग्रवाल यांच्यासह अग्रवाल समाजातील शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते.अग्रसेन महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित या शोभायात्रेतून धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक एकता, पाणी बचत आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे मुर्तिजापूर शहरात जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला.
लोक कट्टा न्यूज — जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे न्यूज चॅनल