शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शुभम जवंजाळ यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरूच; उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या

मुर्तिजापूर | अकोला

मुर्तिजापूर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या मुर्तिजापूर तालुका अध्यक्ष जवंजाळ यांनी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. मात्र, चार दिवसांपासून उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन सुरू असतानाही प्रशासनाकडून ठोस निर्णय झाला आहे का, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आंदोलकांच्या मागण्यांवर प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाही तर पीक नाही, पीक नाही तर शेतकरी नाही!

या घोषवाक्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यथा मांडत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कापूस व तूर पिके वाचविण्यासाठी वाढीव मुदत, शेतीसाठी पाणी उपलब्ध न झाल्यास नुकसानभरपाई, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई, नवीन पीककर्जाचे वाटप आणि शेतमजूर कुटुंबांना मदत ओ मायक्रो फायनान्स ची सक्तीचीं वसुली अशा विविध मागण्या संघटनेने पुढे केल्या आहेत.

चार दिवस उलटले, निर्णयाची प्रतीक्षा!शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवर तोडगा निघावा, या मागणीसाठी शुभम जवंजाळ यांनी उपविभागीय कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवले आहे. आंदोलनाचा चौथा दिवस उजाडला असतानाही मागण्यांवर ठोस निर्णयाची प्रतीक्षा कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असताना त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासनाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आता प्रश्न एकच — शेतकऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन कधी निर्णय घेणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us