
मुर्तीजापूर | प्रतिनिधी
मुर्तीजापूर शहरातील जुन्या बस्ती परिसरातील स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रभाग क्रमांक ४ मधील गुलाम नबी आझाद शाळेसमोरील नाला घाण आणि कचऱ्याने भरल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे नगर परिषद प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, परिसरातील नागरिकांनी नाल्याची तातडीने स्वच्छता करण्याची मागणी केली आहे.
शहरात नियमित स्वच्छता होणे अपेक्षित असताना, संबंधित नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे दिसून येत आहे. यामुळे परिसरातील स्वच्छतेबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. नाल्याची वेळोवेळी स्वच्छता केली जाते का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
नगर परिषद प्रशासन दखल घेणार का?प्रभाग क्रमांक ४ मधील या समस्येकडे नगर परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नाल्याची स्वच्छता करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये, यासाठी नियमित स्वच्छतेचे नियोजन करणे गरजेचे आहे.आता मुर्तीजापूर नगर परिषद प्रशासन या प्रकरणाची दखल घेणार का? नाल्याची स्वच्छता कधी होणार?