शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल; उपोषणस्थळी अधिकाऱ्यांची उपस्थिती, मंगरूळ कांबे बॅरेजच्या पाण्याच्या प्रश्नावर तोडग्याची आशा

मुर्तिजापूर | प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या *लोक कट्टा न्यूज*च्या बातमीनंतर आज आंदोलनस्थळी अधिकाऱ्यांनी भेट दिल्याचे दिसून आले. मंगरूळ कांबे बॅरेजमधून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मुर्तिजापूर तालुका अध्यक्ष शुभम जवंजाळ यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवसापर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या आणि पाण्याचा प्रश्न लोक कट्टा न्यूजने मांडला होता.

त्यानंतर आज संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन परिस्थितीची दखल घेतली. तहसीलदार शिल्पा बोबडे आणि जलसंधारण व पाटबंधारे विभागाचे राठोड साहेब यांनी मंगरूळ कांबे बॅरेजमधून शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर योग्य ती कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. तसेच जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याशी चर्चा करून या समस्येवर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.

जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम सुरूच!लोक कट्टा न्यूजने शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. आंदोलनस्थळी अधिकाऱ्यांनी भेट दिल्याने या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जात असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाणी मिळेपर्यंत आणि मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत या प्रश्नाचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरणार आहे.

लोक कट्टा न्यूजचा निर्धार — प्रसिद्धीसाठी नव्हे, तर जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us