श्री लक्षेश्वर संस्थानचे चोख नियोजन; कृत्रिम बोटींद्वारे विसर्जन, भाविकांसाठी विविध सुविधा

लोक कट्टा न्यूज | मूर्तिजापूर

मूर्तिजापूर व दर्यापूर तालुक्यांच्या सीमेवर पूर्णा नदीच्या तीरावर वसलेल्या पश्चिम विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र लाखपुरी येथे नऊ दिवस चाललेला देवी मूर्ती विसर्जन सोहळा शांततेत व उत्साहात संपन्न झाला. रविवार, १८ ऑक्टोबर ते सोमवार, २६ ऑक्टोबरदरम्यान पार पडलेल्या या सोहळ्यासाठी श्री लक्षेश्वर संस्थानच्या वतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.यंदा पूर्णा नदीत मुबलक पाणी असल्याने मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोला महानगर आणि अंजनगाव परिसरातून मोठ्या संख्येने भाविक देवी मूर्ती विसर्जनासाठी लाखपुरी येथे दाखल झाले. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन संस्थानने प्रकाशव्यवस्था, वाहनतळ, मंडप, शुद्ध पिण्याचे पाणी, भोजनव्यवस्था आणि मंदिर परिसरात विद्युत रोषणाईची सोय केली होती. दसऱ्यानंतरच्या दिवशी भाविकांना मसालेभाताचे वाटपही करण्यात आले.

कृत्रिम बोटींद्वारे सुरक्षित विसर्जनमहिला मंडळांच्या शारदा देवीच्या मूर्ती, सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या मूर्ती तसेच घरगुती घटांचे विसर्जन श्री लक्षेश्वर संस्थानच्या तैराकी पथकाने कृत्रिम बोटींच्या मदतीने खोल पाण्यात केले. नऊ दिवस अहोरात्र सेवा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या योगदानाचे भाविकांनी कौतुक केले.आमदार हरीशभाऊ पिंपळे यांचे आभारलाखपुरी येथे भाविकांच्या सोयीसाठी पक्का काँक्रीट रस्ता, नदीवरील घाट, भोजनासाठी सुसज्ज कक्ष आणि वाहनतळ यांसारख्या सुविधा उपलब्ध झाल्याबद्दल भाविकांनी आमदार हरीशभाऊ पिंपळे यांचे अभिनंदन करून आभार मानले.

प्रशासन व पोलिसांचे सहकार्यविसर्जन सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी संदीप अपार, उपजिल्हाधिकारी शिल्पा बोबडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, अपर तहसीलदार गिरजादेवी, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक दीपक महाडिक आणि उपनिरीक्षक चंदन वानखडे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.विसर्जनासाठी आलेल्या विविध मंडळांचे संस्थानच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सोहळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे भाविक, मंडळांचे पदाधिकारी, सेवाधारी कार्यकर्ते, प्रशासन, पोलीस विभाग आणि प्रिंट, सोशल व इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांचे श्री लक्षेश्वर संस्थानने आभार मानले.

लोक कट्टा न्यूज — जनतेच्या प्रश्नांना व्यासपीठ, जनहिताच्या बातम्यांना प्राधान्य!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us