पुणे येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राज्यस्तरीय सोहळ्यात गौरव

मुर्तिजापूर : येथील शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख तथा वॉर फाउंडेशनचे संस्थापक दीपक केशवराव दांदळे यांना पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘हिंदूरत्न पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे खादी व ग्रामोद्योग मंत्री रविंद्र साठे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शनिवारी सायंकाळी ६ वाजता झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंत्री रविंद्र साठे होते. प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सुरेश जगन्नाथ रौंदळे, डॉ. पांडुरंग दगडू सराफ, राज्य मंत्र्यांच्या स्वीय सचिव सौ. विजयमाला महादेव पवार तसेच प्रवचनकार ह.भ.प. डॉ. रविंद्र भोळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

दीपक दांदळे हे राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, गेल्या तीन ते चार वर्षांपासून सामाजिक क्षेत्रातही विविध उपक्रमांच्या माध्यमातून योगदान देत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यात सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आपले मित्र अनिल डाहेलकर आणि पत्नी सौ. सुनीता दांदळे यांचे आभार मानले. तसेच हा पुरस्कार आपल्या आई-वडिलांना समर्पित केला.राजकीय क्षेत्रात जनहिताच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे दीपक दांदळे यांनी सामाजिक कार्यातूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी कार्य करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना या पुरस्काराच्या माध्यमातून गौरविण्यात आले.

दीपक पाटील दांदळे यांना ‘हिंदूरत्न पुरस्कार’ मिळाल्याबद्दल अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, सहयोगी पदाधिकारी, शिवसैनिक तसेच वॉर फाउंडेशनचे जिल्हा व तालुका प्रमुख, गटप्रमुख आणि शाखाप्रमुख यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us