ऑटो रिक्षातून दोन किलो गांजा जप्त; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

मूर्तिजापूर (प्रतिनिधी) : अकोला जिल्ह्यात अवैध अमली पदार्थांची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध अकोला पोलीस दलाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार-नार्को स्ट्राईक’ अंतर्गत मूर्तिजापूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत ऑटो रिक्षातून दोन किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, नासिर खान हबीब खान (रा. गुलिस्तान नगर, यास्मिन नगर झोपडपट्टी) आणि शेख शब्बीर शेख समद (रा. यास्मिन नगर झोपडपट्टी) हे ऑटो रिक्षा क्रमांक MH 27 BW 3577 मधून गांजा मूर्तिजापूर शहरात आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत संबंधितांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी दोन किलो गांजा जप्त केला असून, दोन्ही आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, राजेंद्र वानखेडे, एएसआय पांडे, पोलीस हवालदार सचिन दुबे, गजानन खेडकर तसेच पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

अमली पदार्थांच्या अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांचा कडक इशारा!

अकोला जिल्ह्यात अमली पदार्थांची अवैध विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अकोला पोलीस दलाने दिला आहे. या कारवाईमुळे अवैध अमली पदार्थांच्या व्यवसायात सहभागी असणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोक कट्टा न्यूज — जनतेचा आवाज, जनतेच्या हक्कासाठी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us