जलसुरक्षा, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत शेतीविषयी विविध उपक्रमांतून जनजागृती

मूर्तिजापूर : तालुक्यातील खापरवाडा येथे कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था, मलकापूर यांच्या वतीने संस्थेचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या बीसीआय प्रकल्पांतर्गत शेतकरी, शेतमजूर, महिला तसेच वंचित घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.सन १९९१ मध्ये तळणी या छोट्याशा गावातून संस्थेची स्थापना झाली. आज संस्था देशातील सुमारे दहा राज्यांमध्ये कार्यरत आहे. शाश्वत व हवामान अनुकूल शेती, महिला सक्षमीकरण, जलसुरक्षा, पाणलोट व्यवस्थापन आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून संस्था विविध क्षेत्रांत काम करीत आहे.वर्धापनदिनाचे औचित्य साधून खापरवाडा येथे विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेतकरी व शेतमजुरांना संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली. तसेच ‘वॉटर बजेटिंग’ या खेळाच्या माध्यमातून पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सापशिडीच्या खेळातूनही शेतकऱ्यांना विविध विषयांची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.या कार्यक्रमाला क्षेत्र प्रवर्तक शेख वहीद, सचिन पाथरे, विवेक काकड, विशाल राऊत यांच्यासह परिसरातील शेतकरी व शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us