पीक विमा, बोगस बियाणे, नुकसानभरपाई व दुष्काळी मदतीच्या मागण्यांवर शेतकऱ्यांचा आवाज बुलंद!

मूर्तिजापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांकडे वेधण्यासाठी सोमवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी मूर्तिजापूर येथील शेतकरी मंडळ कार्यालय, बोंडे चेंबर्स येथे प्रगती शेतकरी मंडळाच्या वतीने विचारविनिमय सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा उत्साहात संपन्न झाली.या सभेमध्ये सन २०२५-२६ व २०२६-२७ या वर्षांचा अद्याप प्रलंबित असलेला पीक विमा, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर निधी, बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, एक लाख रुपये दुष्काळी मदत तसेच शेताला कुंपण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे, अशा महत्त्वपूर्ण मागण्यांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीतील अडचणी, आर्थिक परिस्थिती, पीक विम्याबाबतच्या समस्या आणि शासनाकडून असलेल्या अपेक्षा मांडल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.या सभेला राजू वानखडे, अरुण बोंडे, गोपाल बाबल, गोलू उर्फ मोहित गुप्ता, श्रेयस ढोरे, प्रवीण, हर्षल मेहरे, रमेश घाटे, प्रदीप गावंडे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटितपणे आवाज उठवून त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार या सभेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us