धोत्रा शिंदे (दिनांक १७ नोव्हेंबर २०२६):ज्यांच्या एका गर्जनेने संपूर्ण महाराष्ट्र जागा व्हायचा आणि ज्यांनी मराठी माणसाला स्वाभिमानाने जगायला शिकवले, अशा हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १७ नोव्हेंबर स्मृतिदिनानिमित्त (पुण्यतिथी) आज धोत्रा शिंदे येथे विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन मनोज पाटील गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.आज येथील शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे चौक, जवळ हा अभिवादन सोहळा पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, अमर रहे अमर रहे, बाळासाहेब अमर रहे, आवाज कोणाचा शिवसेनेचा या घोषणांनी परिसर भावनिकमय झाला होता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धोत्रा शिंदे शाखेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात आपल्या अमोघ विचारांनी आणि खणखणीत नेतृत्वाने महाराष्ट्राच्या समाजकारणात व राजकारणात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या या महापुरुषाना वदंन करून हा सोहळा पार पडला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us