रांची (झारखंड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व; आमदार हरीशभाऊ पिंपळे यांच्या हस्ते जाहीर सत्कार

मूर्तिजापूर : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मूर्तिजापूर येथील एका सर्वसामान्य, कष्टकरी कुटुंबातील हार्दिक रमेश प्रधान याने ‘स्कूल नॅशनल’ तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड होण्याचा बहुमान पटकावला आहे. मातंग समाजाच्या इतिहासात मूर्तिजापूर मधून राष्ट्रीय स्तरावर निवड होण्याचा हा पहिलाच गौरवपूर्ण क्षण ठरला असून, आगामी काळात रांची (झारखंड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.एका सामान्य कुटुंबातून पुढे येत हार्दिकने मिळवलेले हे यश संपूर्ण समाजासाठी आणि शहरातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. आपल्या माता-पित्याचे नाव उंचावणाऱ्या या गुणी खेळाडूचा मूर्तिजापूरचे आमदार हरीशभाऊ पिंपळे यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार पिंपळे यांनी हार्दिकचे मनापासून कौतुक करत राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या.सत्कार समारंभास मान्यवरांची उपस्थितीया गौरव सोहळ्याला नगराध्यक्ष हर्षल साबळे, नगरसेवक गजानन नाकट, सत्यनारायणजी तिवारी, डॉ. तुषार बायस्कर, भारत जेठवाणी, रमेश दर्यानी, विलास वानखडे, सुनील भोजगडिया, रवी चौहाण, सोहन सरवरे, दीपक खंडारे, सर्पमित्र मुन्ना श्रीवास, ज्ञानेश्वर टाले सर, पत्रकार संतोष माने, चेतन मेहरे, गजानन चव्हाण, राम नेमाडे, रमेश प्रधान तसेच सिटी तायक्वांदोचे प्रशिक्षक दिनेश श्रीवास आदी मान्यवर उपस्थित होते.

यशाचे श्रेय आई-वडील आणि प्रशिक्षकांनासत्काराला उत्तर देताना हार्दिक प्रधान म्हणाला की, “घरातील परिस्थिती सामान्य असली तरी आई-वडिलांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले. सिटी तायक्वांदोचे प्रशिक्षक दिनेश श्रीवास सर यांचे अचूक मार्गदर्शन आणि माझ्या मेहनतीमुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो.”लहान वयात राष्ट्रीय स्तरावर झेप घेणाऱ्या हार्दिकच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रांची येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेतही तो आपल्या कौशल्याची चमक दाखवून मूर्तिजापूरचा व महाराष्ट्राचा झेंडा फडकवेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us