

मूर्तिजापूर | प्रतिनिधी शहरातील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथे आज दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘स्वच्छ हॉस्पिटल, सुंदर हॉस्पिटल’ या अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान रुग्णालय परिसर, बाहेरील भाग तसेच विविध विभागांमध्ये साफसफाई करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या मोहिमेला मार्गदर्शक म्हणून आमदार हरीश भाऊ पिंपळे यांचे मार्गदर्शन लाभले. या मोहिमेचे आयोजन नगरसेवक लखन मिलांदे यांनी केले.या उपक्रमात सुनील भाऊ लक्ष्वानी, रुग्ण कल्याण समिती सदस्य सुभाष भाऊ गोसावी, तसेच बंडू काका लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहिमेचे कार्य करण्यात आले. सर्वांच्या सहकार्याने रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. रुग्णालय परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
लोक कट्टा न्यूज — जनतेचा आवाज, जनतेच्या हक्कासाठी!